DNA

 निरोगी आणि आनंदी कुटुंबाचे गुपित डीएनए तपासणी



डीएनए तपासणी का व कशी करतात हे प्रश्न तुमच्या मनात येत आहेत का सध्याच्या परिस्थितीमध्ये covid मुळे आरोग्याचे महत्त्व खूप वाढले आहे. corona याचा जास्त त्रास कोणाला झाला तर त्यांची रोगप्रतिकार शक्ती कमी होती आणि ज्यांना पूर्वीपासून काही आजार होते  अशा  लोकांना झाला. आज प्रत्येकजण फिट राहण्यासाठी व प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी करत आहेत पण आपल्या DNA प्रमाणे आहार व्यायाम व हेल्थ चेकअप केले तर प्रतिकारशक्ती वाढू शकते.


• तुमच्या DNA ची संरचना तुम्हाला समजून घ्यायचे आहे का
• तुमचा आहार आणि व्यायामाचे नियोजन तुमच्या DNA प्रमाणे करायचे आहे का
• रोगांच्या लक्षणा बद्दल निरीक्षण करायचे का
• आजार काढण्यासाठी किंवा पुढे ढकलण्यासाठी जीवनशैलीत बदल कसे करणे
• नियमित आणि वैयक्तिक प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी यांचे नियोजन कसे करणे
     या सर्व गोष्टींची माहिती हवी असेल आणि तुम्हाला मनापासून वाटत असेल आपण व आपले कुटुंब निरोगी आणि आनंदी हवे का तर काळजी करू नका हा ब्लॉग तुमच्यासाठीच आहे शेवटपर्यंत वाचा.
      नमस्कार,
      मी रोमा HEALTH AND WEALTH CHAMPION या PLATFORM संस्थापिका मला येत्या तीन वर्षांत 6000 कुटुंबांना हेल्थ वेल्थ योग्य ज्ञान देऊन त्यांना हेल्दी आणि वेल्धी बनविणे हा माझा ध्यास आहे .


DNA तपासणीचे फायदे..

      डी एन ए चा प्रभाव+ जीवनशैली= आरोग्य
      
      ( DNA  कधीच न बदलणारा आणि नेहमी खरे  बोलणारा  )

 डी एन ए  एक वैयक्तिक जेनेटिक तपासणी , तुमच्या डी एन ए च्या तपासणीचे रिपोर्ट तुम्हाला तुमची जीवनशैली, आरोग्य ,आहार, तंदुरुस्ती आणि सवयी जागरूकतेने निर्णय घेण्यात मदत करतात .
तुमचा डीएनए जाणून घ्या !
तुमचा DNA तुमच्या एकूण आरोग्याची आणि प्रकृतीची एक संपूर्ण कथा सांगत असतो तुमची जीवनशैली आणि जगण्याची गुणवत्ता वाढविण्यासाठी तुम्ही ती फक्त समजून घ्यायची असते....

विज्ञान काय सांगते...
1..आपले शरीर अगणित पेशींनी बनलेले असते.
2.. प्रत्येक पेशीच्या डीएनएमध्ये आपली DNA संरचना असते . हीच रचना आपल्या आयुष्याचा मूळ आधार असतो.
3.. आपला डी एन ए   न्यूक्लियोटाइड्स  ॲडनिन (ए), थामाइन (टी), ग्वानिन (जी) आणि सायटोसिन
( nucleotides Adenine (A), Thymine (T), Guanine (G), and Cytosine ( C) 
या चार न्यूक्लि यो टाइड्स ने बनलेले असते..
   
4.. हे चार न्यूक्लि यो टाइड्स आपल्या DNA  मुळाक्षरे आहेत. या चार अक्षरांच्या समूहातून DNA तयार होतात आणि अशा   DNA च्या संचाला जि नो टाईप  म्हणतात. जि नो टाईप अक्षरांमधील छोटे-छोटे बदल तुम्हाला अद्वितीय बनवतात.
 उदाहरणार्थ ,CAT ,RAT आणि BAT या शब्दांची तुलना करा. एक अक्षर सोडले तर या तिन शब्दांमधील बाकी चे अक्षरे सेम आहे पण त्या एका अक्षराने शब्दांचा अर्थ बदलतो.
  आपल्या DNA पैकी 99.9% डी एन ए सर्वांचे समान असतात फक्त 0.01% वेगळा हा अगदीच नगण्य फरक एक दुसऱ्या माणसाच्या  DNA पासून वेगळा असतो.
  
डीएनए कोड मध्ये आपली अनुवंशिक माहिती असते. डी एन ए एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जातो. त्यामुळे काही सवयी चेहरा स्वभाव त्वचा आपल्या वंशातील लोकांची मिळते-जुळते असू शकतात.
आपल्या शरीरातील डी एन ए 50% आईकडून तर 50% बाबांकडून येतात. म्हणजे जे आजार आपल्या आई-बाबां ना आहे ते आपल्याला येऊ शकतात, पण आपल्या आई- बाबांना कुठले आजार नव्हते पण त्यांच्या आई-बाबांना असे मागे सात पिढ्या गेले त्या पिढीतून सुद्धा काही आजार आपल्यामध्ये येत असतात.

वारसाहक्काने ज्या गोष्टी आपल्याला मिळाल्या,
उदा. जमीन प्रॉपर्टी घरभाडे संपत्ती संभाळून ठेवण्याचा आपण प्रयत्न करतो.
पण शारीरिक दृष्ट्या काय मिळाले हे ते कसे समजणार तर डी एन ए टेस्ट द्वारे समजू शकते.

डीएनए टेस्ट करण्यासाठी आपल्याला तोंडातील लाळ (SALIVA) केस, स्किन ,रक्त  यापैकी एकाचा नमुना घेतला जातो.
आणि मग काही दिवसातच आपला DNA रिपोर्ट तयार केला जातो. डीएनए तपासणी केल्याने आपल्याला आपले संपूर्ण जेनेटिक इन्फॉर्मेशन पण त्याचबरोबर आपल्याला आयुष्यात पुढे कुठले आजार होणार आहे किंवा होण्याची शक्यता आहे का याबद्दल अगोदरच माहिती मिळते.

 डी एन ए टेस्ट मधून समजणार या गोष्टी....


 डी एन ए टेस्ट मधून हृदयविकार ,कॅन्सर ,हाडांचे विकार, पोषक तत्वांचा कमतरतेमुळे होणारे विकार/आजार अशा प्रकारचे कोणत ते ही विकार होण्याची शक्यता आहे का याची आधीच माहिती मिळते.
 DNA टेस्ट द्वारे भविष्यात होणारे आजार आपल्याला अगोदरच कळल्यामुळे आपण त्यावर योग्य ते प्रिव्हेंटिव्ह उपचार करून रिस्क कमी करू शकतो किंवा आजार टाळता येऊ शकतात.
 
डीएनए नुसार डायट प्लान..


आपल्या DNA नुसार किंवा Genetic गरजेनुसार पर्सनल डायट प्लान करून घेणे का गरजेचे आहे . कारण प्रत्येक व्यक्ती जेनेटिक लेव्हल वर वेगवेगळी किंवा डिफरंट असतो तसेच आहाराच्या बाबतीत देखील किंवा न्यूट्रिशन च्या बाबतीत देखील प्रत्येकाची गरज रिक्वायरमेंट वेगवेगळे असते .बरेचसे आजार न्यूट्रिशन च्या कमतरतेमुळे  किंवा पोषक तत्वाच्या कमतरतेमुळे होतात. कारण प्रत्येकाच्या शरीरात प्रत्येकाची पचन शक्ती आणि शोषण क्षमता वेगवेगळी असते एखाद्याला एखादा अन्न पदार्थ खाल्ल्याने काहीच त्रास होत नाही तर एखाद्याला त्रास होऊ शकतो. एखाद्याला  lacto इन टॉलरन्स असल्याने त्याने दूध किंवा दुधाचे पदार्थ घेतल्यास त्रास होऊ शकतो, तो च त्रास दुसऱ्याला नाही होणार, तसेच एखाद्याला चपाती किंवा गव्हाचे पदार्थ खाल्ले तर काहीच त्रास होत नाही दुसऱ्याला त्रास होऊ देखील शकतो कारण त्याला Gluten इन टॉलरन्स किंवा Wheat एलर्जी सुद्धा असण्याची शक्यता
असते .प्रत्येकाच्या  शरीरातील DNA प्रत्येक अन्नपदार्थांना वेगवेगळ्या प्रकारे respond देत असतात. जर आपण पण आपल्या DNA प्रमाणे आहार नाही घेतला तर अनेक प्रकारचे आजार होण्याची शक्यता असते त्यामुळे ते होऊ नये म्हणून आपण आपल्या DNA सूट करणारा आहार दिला पाहिजे हे आपल्या डी एन ए टेस्ट केल्यामुळे कळू शकते.


 डी एन ए ला सूट करणारा आहार जर का आपण घेतला तर आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे अनेक मोठ्या आजारांना कॅन्सर ,हार्ट अटॅक, डायबिटीस, हाय कोलेस्ट्रॉल ,हाय बीपी, मेंदूचे दातांचे , हाडांचे विकार तसेच केसांच्या आणि त्वचेच्या विकारांना आपण टाळू देखील शकतो.
डीएनए तपासणी मधून आपण हेल्थ फिटनेससाठी साठी कुठला व्यायाम केला पाहिजे हे आपल्याला परफेक्ट समजते.
 आपल्याला काही सवय असतात चहा, कॉफी ,स्मोकिंग, तंबाखू अल्कोहोल या सवयींचा डी एन ए प्रमाणे भविष्यात काय बरा -वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे का हे देखील समजते .
 मी आणि माझ्या कुटुंबातील सर्वांना डीएनए टेस्ट करून घेतली आहे याचा आम्हाला खूप फायदा झाला आहे तर मग आपल्याला आजार होऊच नये म्हणून आपल्या वेळेनुसार किंवा आपल्या जेनेटिक टाईप नुसार पर्सनल डायट प्लान तयार करून व भविष्यात होणाऱ्या आजारांवर योग्य उपचार करून आपण आपले आरोग्य उत्तम ठेवूया.
  

डीएनए  बदलत नाही तो त्यामुळे डीएनए टेस्ट आयुष्यात एकदाच करायचे आहे डीएनए रिपोर्ट वर काउंसलिंग मिळते जीवनभर निरोगी सुदृढ शरीरासाठी तुमचे डीएनए तपासणी रिपोर्ट एखाद्या प्रकृती पुस्तकाप्रमाणे मार्गदर्शनाची भूमिका बजावतील.
 
आतापर्यंत भारतामध्ये डी एन ए टेस्ट टेस्ट हजारो लोकांनी केलेली आहे. त्यापैकी  भारतातील क्रिकेटर  त्यांच्या  डायट आणि फिटनेस साठी  त्यांचा  चार्ट तयार केला जातो  आणि त्याच्यामुळे  त्यांचे न्यूट्रिशन आणि डायट काय असायला पाहिजे  हे त्यांना समजल्यामुळे  त्यांना स्पोर्ट्स मध्ये त्याची मदत होते  त्यामुळे त्यांनी DNA करून घेतलेले आहे. डी एन ए तपासणीमुळे खूप लोकांचे वाचले आरोग्य वाचले सुद्धा आणि वाढले सुद्धा. तुम्ही पण नक्की करा.

 हा ब्लॉग शेवटपर्यंत वाचला आभारी आहे .ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट मध्ये कळवा. काही प्रश्न असतील तर नक्की विचारा कमेंटमध्ये रिप्लाय करा किंवा व्हाट्सअप (9820784479)केले तरी चालेल. 
 ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुमच्या एका शेअरिंग मुळे कुणाचे तरी आयुष्य वाचू शकते आणि बदलू देखील शकते.
 🙏 धन्यवाद
Roma 




Comments

  1. Amazing Blog. Very informational. Indeed DNA is a very important aspect of human body and the over all configuration of our body is dependent on it. Really necessary information for all.
    Do read my blogs here
    https://siddhishripadkulkarni.blogspot.com/?m=1

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

टाटा एआईए परम रक्षक प्रो के फायदे

का महत्वाचे आहे रुटीन हेल्थ चेक अप आणि त्याचे फायदे

नैसर्गिकरित्या वजन कसे कमी करावे: आश्चर्यजनक रिझल्ट साठी उपयुक्त अंतर्दृष्टी.