का महत्वाचे आहे रुटीन हेल्थ चेक अप आणि त्याचे फायदे




आजच्या युगात रूटीन चेकअप ही प्रत्येकाची गरज बनली आहे. बदलत्या जीवन शैलीत आणि वेगवान अशा जीवनात तुम्ही कधी आणि कोणत्या आजाराच्या जाळ्यात पडाल हे आपण सांगू शकत नाही.अशावेळी आपण नियमित तपासणी करत राहू आणि आपल्या आरोग्याबाबत पुरेशी खबरदारी घेत राहणे आवश्यक आहे.


चला तर मग बघूया कोणत्या BASIC तपासणी करून घेणे महत्वाचे आहे.



आपला (रक्तदाब) BP उच्च किंवा कमी असो, नियमितपणे रक्तदाब तपासणे महत्वाचे आहे, कारण त्याचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होतो. उच्च रक्तदाब  असल्यास  हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकची शक्यता वाढते. अशा परिस्थितीत, जेव्हा जेव्हा तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडे जा, तेव्हा तुमचा बीपी तपासून पहा.



आपण नियमितपणे आपले वजन मोजत रहावे. अचानक आणि अतिशय वेगवान वजन वाढणे आणि कमी होणे या दोन्ही गोष्टी सूचित करतात की आपण एखाद्या आजाराने ग्रस्त आहात. OVER WEIGHT याचा अर्थ HEART,  LIVER(यकृत) आणि (मूत्रपिंड) KIDNEY च्या आजाराकडे  घेऊन जाऊ शकतो, तर वजन कमी होणे INFECTION (संक्रमण) किंवा CANCER (कर्करोग) दर्शवते. थायरॉईड असला तरीही वजन वेगाने वाढणे किंवा कमी होण्यास सुरवात होते.



आपली रक्त तपासणी वेळोवेळी करत रहा. यामुळे रक्तामध्ये ग्लूकोजची पातळी, रक्तातील इलेक्ट्रोलाइटची संख्या कायम राहील, जे मूत्रपिंड(KIDNEY) आणि हृदयाच्या समस्यांना आपल्याला सूचित करते.

कोलेस्ट्रॉल टेस्ट हीसुद्धा वयानुसार करणे गरजेचे आहे. हाय कोलेस्ट्रॉल मुळे आपल्या हृदयाला धोका असू शकतो.

Liver problems समजण्यासाठी यकृत फंक्शन टेस्ट (एलएफटी) केले जाते. एलएफटीमध्ये वाढ सूचित करते की आपले यकृत योग्यप्रकारे कार्य करत आहे की नाही.



रूटीन यूरिन टेस्‍ट SUGAR साखर शोधन्यसाठी नियमितपणे Urine test  केली पाहिजे. सौम्य infection, रंग बदलणे पण दुर्गंधी येणे, लघवी होण्याच्या वेळी वेदना हे मोठ्या आजाराची लक्षणं असू शकतात.



X-RAY हेसुद्धा रुटीन करणे गरजेचे आहे.यामुळे किडनीचे प्रॉब्लेम लंग्स कॅन्सर, किंवा हृदयाचा आकार वाढणे त्याला कार्डियो महापाती आजार असेल तर तेसुद्धा कळू शकते.



हार्ट problem साठी ECG इलैक्ट्रोकार्डियोग्राफी करणे महत्त्वाचे आहे यामुळे हृदयाचे पंपिंग म्हणजेच कार्यक्षमता समजते.




मॅमोग्राफी ही टेस्ट महिलांसाठी खूप महत्त्वाचे आहे वयाच्या चाळीस नंतर करणे अत्यंत गरजेचे आहे. यामध्ये ब्रेस्ट म्हणजेच स्तनांच्या कॅन्सरची शक्यता समजण्यासाठी मदत होते.



तसेच महिलांनी दोन ते तीन वर्षांनी PAP SMEAR टेस्ट करणे खूप महत्त्वाचे आहे त्यामुळे यूट्रस रिलेटेड म्हणजेच गर्भाशयाच्या कॅन्सरची शक्यता कळते.

वर सांगितलेल्या सगळ्या तपासण्या खूप महत्त्वाच्या आहेत. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि कमेंट करा. तुमच्या एका शेअर मुळे नक्कीच एखाद्याला फायदा होऊ शकतो.अशाच अजून हेल्थ साठी कोणत्या ऍडव्हान्स टेस्ट करणे गरजेचे हे पुढील ब्लॉग मध्ये मी सांगणार आहे.

फ्री कन्सल्टींग साठी तुम्ही मला व्हाट्सअप सुद्धा करू शकता.9820784479

माझा ब्लॉग शेवटपर्यंत वाचला याबद्दल धन्यवाद.



Comments

Post a Comment

Popular posts from this blog

टाटा एआईए परम रक्षक प्रो के फायदे

नैसर्गिकरित्या वजन कसे कमी करावे: आश्चर्यजनक रिझल्ट साठी उपयुक्त अंतर्दृष्टी.